In Shevgaon, thieves have stolen Rs 3 lakh in the afternoon 
अहिल्यानगर

भरदिवसा चोरांनी तीन लाखांचा ऐवज केला लंपास

सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : घरातील व्यक्ती लग्नसोहळ्यासाठी गेल्याची संधी साधून चोरांनी दुपारी घराचा दरवाजा तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तीन लाख सहा हजारांचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी (ता. 8) दुपारी देवटाकळी येथे ही घटना घडली. 

विजय शंकर खरड (रा.देवटाकळी) यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की पत्नी व दोन मुलांसह शुक्रवारी नेवासे तालुक्‍यात नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी गेलो होतो. सायंकाळी घरी आलो तेव्हा घर उघडे होते. पोलिसांना तत्काळ माहिती दिली.

चोरांनी कपाटातील सामानाची उचकापाचक करून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, असा तीन लाख सहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT